चाणक्याने सांगितले आहे की आई-वडिलांचे सर्वात मोठे कर्तव्य म्हणजे मुलांना योग्य शिक्षण देणे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही.
मुलांच्या चारित्र्य घडवण्याची जबाबदारी पालकांवर आहे. सत्य, प्रामाणिकता, संयम, आणि कर्तव्यपालनाचे धडे मुलांना लहानपणापासून शिकवावेत.
पालकांनी मुलांना योग्य दिशेने मार्गदर्शन करावे. चुकीच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे आणि चांगल्या गोष्टींचा अंगीकार करायला प्रेरित करावे.
चाणक्य म्हणतो की आई-वडिलांनी मुलांना पैशाचे महत्त्व आणि त्याचा शहाणपणाने वापर शिकवले पाहिजे. अपव्यय टाळण्याची आणि बचतीची सवय लावावी.
मुलांना आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करावा. त्यांना स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला शिकवावे आणि स्वावलंबी बनवावे.
मुलांना चांगले नागरिक बनवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यांच्यात इतरांसोबत सहकार्य, दया, आणि आदर यांसारख्या गुणांचा विकास करावा.
सर्वांच्या नजरा असतील शिक्षिकेवर!, 26 जानेवारीला निवडा लहरिया साडी
स्टायलिश अँड एलिगेंट लूकसाठी 18K Gold चे 8 स्पाइक डिझाइन इअररिंग्स
Republic Day 2025 : देशातील 5 थोर क्रांतीकारांचे विचार करा आत्मसात
सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी चॉकलेटपासून तयार करा या 5 रेसिपी, होतील खूश