बदाममध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स आणि विटामिन ई असते, जे स्मरणशक्ती सुधारते. विद्यार्थ्यांसाठी आणि मेंदूचा जास्त वापर करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त.
बदाम दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते, जे हाडे बळकट ठेवते. सांधेदुखी आणि ऑस्टिओपोरोसिससाठी फायदेशीर.
कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. बदाम दुधातील मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतो.
व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा तजेलदार व मुलायम होते. नियमित सेवन केल्यास सुरकुत्या आणि त्वचेवरील डाग कमी होतात.
लॅक्टोज-फ्री असल्याने ज्यांना गायीचे दूध जमत नाही, त्यांच्यासाठी उत्तम पर्याय. पचनसंस्था सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
लो-कॅलरी आणि हेल्दी फॅट्स असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. साखरेशिवाय घेतल्यास वजन कमी करण्यासाठी उपयुक्त.
झिंक, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स मुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. सर्दी-खोकला आणि इतर संसर्गजन्य रोगांपासून बचाव करते.