कलिंगड, लिंबू, पिंक सॉल्ट, पुदीन्याची पाने, बर्फ, लाल तिखट आणि मिरची
सर्वप्रथम कलिंगड कापून त्याचे बारीक तुकडे करुन घ्या. यानंतर मिक्सरमध्ये कलिंगडचा ज्यूस तयार करा. ज्यूस तयार झाल्यानंतर गाळणीने एका भांड्यात गाळून घ्या.
एक ग्लास घेऊन त्यामध्ये कलिंगडचे बारीक तुकडे, बर्फ, पुदीन्याची पाने, लिंबाचे तुकडे घालून क्रश करा.
ज्यूसच्या ग्लासमध्ये कलिंगडचा ज्यूसही सामग्रीमध्ये मिक्स करुन लाल तिखटही घाला. सर्व सामग्री व्यवस्थितीत ढवळून त्यामध्ये उभी चिरलेली मिरची घाला. असे तयार होईल कलिंगडचे मॉकटेल.