फळांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण मार्केटमध्ये सध्या रासायनिक प्रक्रिया केलेली फळं विक्री केली जातात.
सोशल मीडियावर मार्केटमध्ये विक्री केल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीचा एक धक्कादायक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओनंतर खाण्यासंदर्भातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
व्हिडीओमध्ये स्ट्रॉबेरीला लागलेली बुरशी स्वच्छ करुन पॅक केली जातेय. जेणेकरुन ताज्या फळांसोबत विक्री केली जाईल.
खरंतर, स्ट्रॉबेरीच्या पॅकेटमध्ये वरच्या बाजूला ताजी फळ आणि खाली बुरशी लागलेली फळं ठेवली जातात.
बुरशी लागलेल्या फळांचे सेवन केल्याने फूड पॉइजनिंग, पोटासंबंधित समस्या आणि अन्य आजारांचा सामना करावा लागू शकतो.
व्हिडीओ इंस्टावर bano_fitindia नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.