वाढत्या वयात आवश्यक पोषक घटकांची कमी होऊ लागते. मल्टीव्हिटॅमिन गोळ्याऐवजी आहारात विशिष्ट पदार्थांचा समावेश करून ही कमतरता दूर करू शकता. चला तर जाणून घेऊया, ते कोणते पदार्थ आहेत!
हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. पालक, मेथी, मोहरी, ब्रोकोली या भाज्यांत व्हिटॅमिन ए, सी, के, लोह, मॅग्नेशियम असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती, शरीर डिटॉक्स होण्यास मदत करतात.
ड्रायफ्रुट्स, बियांचे सेवन फायदेशीर आहे. बदाम, अक्रोड, काजू, भोपळा बिया यांचा समावेश करा. यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स, झिंक, मॅग्नेशियम असतात, जे हृदय, मेंदू, त्वचेसाठी फायदेशीर आहेत.
दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२, प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. दूध, दही, चीज, तूप हे पदार्थ दैनंदिन आहारात असणे आवश्यक आहे. हे शरीराला पोषक घटक पुरवतात.
आहारात संपूर्ण धान्यांचा समावेश करा. डाळी, हरभरा, राजमा, मसूर, ब्राउन राईस, ओट्स यांसारखे पदार्थ प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, लोह पुरवतात. याने शरीराला ऊर्जा मिळते.
तुम्ही दररोज एक फळ खाऊ शकता. संत्री, केळी, सफरचंद, पपई, डाळिंब इत्यादी फळे नैसर्गिक साखरेचे उत्तम स्रोत आहेत. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते आणि शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात.