उन्हाळ्याचा तापमान वाढताच वॉटर पार्कमध्ये डुबकी मारण्याचा मोह कोणालाही होतो!
पण मजा बिघडू नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात.
कॉटन कपडे टाळा, ते पाण्यात ओले होऊन जड होतात.
नायलॉन किंवा स्पॅन्डेक्स मटेरियलचे स्विमवेअर वापरा, हे लवकर सुकतात आणि आरामदायकही असतात.
त्वचेला उन्हापासून वाचवण्यासाठी SPF 30+ वॉटरप्रूफ सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे.
दर 2 तासांनी पुन्हा लावा, विशेषतः पाण्यात डुंबल्यावर!
संसर्ग टाळण्यासाठी नाक, डोळे, तोंडात पाणी जाणार नाही याची खबरदारी घ्या.
वॉटर राईड्सनंतर आंघोळ करणे विसरू नका.
पाण्यात खेळताना तहान लागत नाही, पण डिहायड्रेशन होऊ शकतो.
सतत पाणी प्या – पाण्याची बाटली सोबत ठेवा.
प्रत्येक राईडचे नियम पाळा – उंची, वजन, वयाच्या मर्यादा पाळणे तुमच्याच सुरक्षिततेसाठी.
मनाई असलेल्या राईडवर जबरदस्तीने जाऊ नका.
मुलांना पाण्यात कधीही एकटे सोडू नका.
त्यांच्या उंची आणि वयानुसारच राईड्स निवडा.
वॉटर पार्कचा अनुभव अविस्मरणीय व्हावा, यासाठी थोडी काळजी घ्या.
सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य दिलं, की मजा दुप्पट होते!
पार्टी-फंक्शनमध्ये दिसाल हॉट, नेसा Raveena Tandon सारख्या साड्या
उन्हाळ्यात स्विमिंग शिकायचे आहे? या सोप्या टीप्स फॉलो करा, बना स्वीमर
घरच्या घरी तयार करा कापसासारखी मऊसुत इडली, जाणून घ्या या खास TIPS
लाडकी नात आजीच्या घरी आली आहे का? तिला गिफ्ट करा 3 grm Gold Earrings