घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बहुतांश भारतीय गणपती, देवी लक्ष्मी आणि हनुमानाची मुर्ती किंवा फोटो लावतात. यामुळे घरात सकारात्मक उर्जा वास करेल.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवाची मुर्ती ठेवणे चुकीचे आहे. वास्तु एक्सपर्ट पंकित गोयल म्हणतात असे करणे चुकीचे आहे. यामुळे देव नाराज होतात.
मुख्य प्रवेशद्वाराकडे सतत वर्दळ असते. याशिवाय धूळ-मातीचा संपर्कही येतो. अशातच मुर्तीचा अनादर झाल्यासारखे होते.
देवाची मुर्ती केवळ देव्हाऱ्यात ठेवावी. याशिवाय घरात मृत्यू झालेल्या व्यक्तींचे किंवा प्रिय व्यक्तीचा फोटो देखील घराबाहेर लावू नये.
मुख्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून घरात उर्जेचा प्रवाह होत असतो. अशातच मुर्ती ठेवल्याने सकारात्मक उर्जा घरात येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.
मुख्य प्रवेशद्वारावर शुभ प्रतीक जसे की, स्वतिक आणि ओम काढावे. याशिवाय प्रवेशद्वाराबाहेर स्वच्छता असावी. जेणेकरुन घरात सकारात्मक उर्जा वास करेल.
ऑफ शोल्डर ब्लाऊजचे 7 ट्रेन्डिंग डिझाइन, दिसाल बोल्ड
Machine vs Hand Wash : लोकरीचे कपडे घरच्याघरी कसे धुवावेत?
डिशवॉशरमध्ये 'ही' 8 भांडी चुकूनही धुवू नका, होऊ शकते मोठे नुकसान
Chanakya Niti: यशासाठी 10 महत्त्वाच्या सवयी, माहिती करून घ्या