डिश वॉशर गरम पाणी आणि कठोर डिटर्जंट वापरतो, म्हणून त्यात नॉन-स्टिक भांडी धुवू नयेत, अन्यथा त्याचा लेप खराब होऊ शकतो.
तांबे आणि पितळेची भांडी डिशवॉशरमध्ये धुतल्याने त्यांचा रंग आणि चमक कमी होऊ शकते. ही भांडी नेहमी हाताने आणि मऊ स्क्रबरने स्वच्छ करावीत.
डिशवॉशरमध्ये लाकडी चमचे, चॉपिंग बोर्ड किंवा इतर भांडी धुतल्याने ती कोरडी होऊन तुटतात, तसेच गरम पाण्यामुळे लाकूड कमकुवत होते, त्यामुळे ते डिशवॉशरमध्ये धुवू नये.
डिशवॉशरच्या उच्च उष्णता आणि स्प्रे प्रेशरमुळे सिरॅमिक किंवा क्रिस्टल भांडी तुटू शकतात, म्हणून ते हाताने धुणे चांगले.
डिशवॉशरमध्ये लोखंडी भांडी धुणे देखील टाळावे. डिशवॉशरमध्ये लोखंडी किंवा कास्ट आयर्नची भांडी धुतल्याने त्यांना गंजण्याचा धोका वाढतो.
आजकाल स्वयंपाकघरातही मातीची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. ही भांडी वजनाने हलकी असून ती सहज तुटू शकतात, त्यामुळे ती डिशवॉशरमध्ये धुवू नयेत.
डिशवॉशरच्या उष्णतेमध्ये प्लास्टिकची भांडी वितळू शकतात. यामुळे त्यांचा आकार खराब होऊ शकतो, म्हणून ते डिशवॉशरमध्ये धुतले जाऊ नयेत.
ताट, वाट्या, चमचे यांसारखी चांदीची भांडी डिशवॉशरमध्ये धुवू नयेत, यामुळे भांड्यांचा लेप खराब होतो आणि चांदीची चमकही कमी होऊ लागते.