असंच कधी तुला
माझ्या आठवणींत
हसताना पाहायचंय
जीवनाचं सुंदर स्वप्न मला
आता तुझ्याचसोबत जगायचंय
Happy Valentines Day
जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं
एक थेंब अळवावरचा,
मोत्याचं रुप घेऊन मिरवतो
एक थेंब तुझ्या ओठांवरचा
माझं जग मोत्यांनी सजवतो
मनाच्या तारा जुळून आलेल्या
सहवासाचा एक मधुर राग छेडलेला
संगतीत तुझ्या फुललेले जीवन
तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला
भाषा प्रेमाची मला कळते आहे
नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे
दूर असूनही मन मनाशी जुळते आहे
आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं, हृदयाला हृदयाशी जोडणारं खास नातं असतं, हॅप्पी व्हॅलेंटाईन डे!
ना कसले बंध, ना कसली वचने
प्रेम म्हणजे खरंतर, मनाने जवळ असणे
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडते
तसेच काहीसे पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येते
Deepika Padukone च्या सौंदर्याचे सीक्रेट आहे हा खास ज्यूस, वाचा फायदे
केसांना मोहरीचे तेल लावण्याचे 5 फायदे, आठवड्याभरात दिसेल फरक
लग्नसोहळ्यातील फंक्शनसाठी बेस्ट 5 सिक्वीन वर्क सलवार सूट, खुलेल लूक
जोडव्यात काही रंग जोडा!, नवीन सुनेसाठी 6 रंगीबेरंगी जोडवी खरेदी करा