हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचे विशेष महत्त्व आहे. तुळशीची पूजा करण्यासह आरोग्यासाठी देखील फायदेशीर अल्याचे म्हटले जाते. पण कडाक्याच्या उन्हात तुळशीचे रोप लालसर किंवा पिवळसर होते.
तुळशीची पाने लालसर होण्यामागील मुख्य कारण म्हणजे कडाक्याचे ऊन आणि रोपाला कीड लागणे. कीड रोपाला वरुनच नव्हे तर मातीतूनही नुकसान पोहोचवू शकतात.
तुळशीच्या पानांमध्ये बदल दिसून येत असल्यास त्यावर लगेच उपाय करा. तुम्ही घरच्याघरी कीटकनाशक खत तयार करू शकता. अथवा लालसर झालेली पानांची छाटनी करा.
पाण्याअभावी देखील तुळशीची पाने लालसर होऊ शकतात. पण लक्षात ठेवा अत्याधिक किंवा कमी पाणी देखील रोपाला घालू नका.
तुळशीच्या रोपाला अत्याधिक पाणी टाकल्याने रोपाच्या मूळांना नुकसान पोहोचले जाऊ शकते. यामुळे देखील हळूहळू रोपाची पाने लालसर किंवा काळी पडू शकतात.
मातीतील ओलसरपणा जाणून घेण्यासाठी बोटांनी माती दाबून पाहा. माती बोटाला सुकलेली किंवा कोरडी वाटत असल्यास त्यामध्ये थोडे पाणी टाका. अन्यथा कोरड्या मातीमुळेही पाने लालसर होऊ लागतात.
तुळशीचे रोप कडक उन्हात ठेवू नका. यामुळेही तुळशीच्या रोपाची पाने लालसर किंवा पिवळसर होऊ शकतात.