Marathi

नाचणी चपाती बनवण्याच्या टिप्स; बनवा परफेक्ट गोल आणि फुलणारी चपाती

Marathi

परफेक्ट गोल आणि फुलणारी नाचनी चपातीसाठी टिप्स

रागी किंवा नाचणी पिठासाठी गरम पाणी वापरा. हे स्टार्च जिलेटिनाइज करते, ज्याने पीठ हाताळण्यास सोपे आणि लवचिक बनवते.

Image credits: social media
Marathi

अशा प्रकारे बनवा नाचणीचे पीठ

एका पॅनमध्ये १ कप पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात नाचनी पीठ घाला आणि सतत ढवळत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. मिश्रण आचेवरून काढा, थोडे थंड होऊ द्या आणि मऊ पीठ मळून घ्या.

Image credits: social media
Marathi

नाचणीचे पीठ थंड होऊ द्या

पीठ तयार केल्यानंतर त्याला 10-15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यामुळे पीठ मऊ होऊन त्याची चपाती चांगली लाटता येते.

Image credits: social media
Marathi

चपाती लाटण्याची ट्रिक

नाचनी चपाती लाटण्यासाठी दोन प्लास्टिक शीट घ्या. त्यात थोडं तेल लावून मधोमध पिठाचा गोळा ठेवल्यावर शीटने झाकून घ्या, मग बेलण्याने गोल फिरवा

Image credits: social media
Marathi

चपाती मध्यम आचेवर भाजा.

नाचनी चपाती जास्त आचेवर भाजल्याने ती जळू शकते, तर मंद आचेवर भाजल्याने ती कोरडी होऊ शकते. ती नेहमी मध्यम आचेवर भाजावी.

Image credits: social media
Marathi

चपाती फुलवण्याची ट्रिक

नाचणी चपाती अर्धी भाजल्यावर चपातीला हलक्या हाताने दाबा, ज्यामुळे चपाती वर येण्यास मदत होते, नंतर ती दुसऱ्या बाजूने भाजा आणि गरम चपातीवर तूप लावा.

Image credits: social media
Marathi

गरमागरम चपाती वाढा

नाचनी चपाती बराच वेळ ठेवल्यावर कडक होऊ शकते, म्हणून तुमच्या आवडत्या भाजीसोबत गरमागरम नाचनी चपातीचा आनंद घ्या.

Image credits: social media

थंडीत खा बाजरीच्या या 5 हेल्दी रेसिपी, आजारांपासून रहाल दूर

थंडीत चेहऱ्यावर दिवसभर राहिल ग्लो, फॉलो करा हे Skin Care Routine

हिवाळ्यात रूम गरम ठेवायचीय, ८ पर्याय माहित करून घ्या

जास्त तेल नाही की मसाला नाही, १५ मिनिटांमध्ये तयार करा आवळा लोणचे