पिरॅमिड आकाराच्या सोनेरी मणी आणि त्याला लटकणाऱ्या छोट्या घुंगरांमुळे हा चोकर खूप ट्रेंडी आणि रॉयल दिसतो. यामुळे ट्रॅडिशनल आणि ट्रेंडी असा दोन्ही लूक मिळतो.
लाल आणि हिरवे खडे वापरून पानांच्या आकाराची ही नेकलेस डिझाईन तुम्हाला एक उत्तम ट्रेंडी आणि क्लासी लूक देते.
सोन्याच्या मण्यांचा सिंगल लेयर असलेला हा नेकलेस अत्यंत सुंदर दिसतो. ज्यांना साधा आणि सिम्पल लूक हवाय, त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
मध्यभागी पोवळे आणि आजूबाजूला कैरीच्या आकाराची डिझाईन असलेला हा नेकलेस तुम्हाला एक ग्रँड आणि आकर्षक लूक देतो.
अशा प्रकारचा नेकलेस विंटेज लूक देतो. सध्या याचा खूप ट्रेंड आहे. लहान मुलींनाही हे खूप छान दिसते. सिम्पल लूक आवडणाऱ्यांसाठी उत्तम निवड.
डबल लेयर गोल्डन बॉल चेनला जोडलेले लाल, हिरवे खडे आणि मोत्यांच्या लटकनांसह असलेले गंडभेरुंड पेंडेंट अतिशय आकर्षक दिसते. साडीवर हा हार खूप उठावदार दिसतो.
लक्ष्मीच्या नाण्यांवर लाल खडे आणि खाली हिरवे खडे असलेला हा चोकर गळाभरून अत्यंत राजेशाही दिसतो. पैठणी किंवा सिल्कच्या साडीवर हे अप्रतिम दिसते.
असा नेकलेस तुम्हाला अस्सल पारंपारिक लूक देतो. मोराची डिझाईन असलेला हा नेकलेस लहान मुलींपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना छान दिसतो.
कमी वजनात असा सुंदर नेकलेस उपलब्ध असतो. तीन लेयर्स असल्यामुळे गळा पूर्ण भरलेला दिसतो आणि एक क्लासी लूक मिळतो.
पारंपारिक लूकसाठी ही एक उत्तम डिझाईन आहे. नाण्यांनी सजवलेला हा नेकलेस गळ्याभोवती पूर्णपणे शोभून दिसतो आणि साडीवर खूप उठून दिसतो.
जुन्या वळणाचा कासू नेकलेस आता ट्रेंडी रूपात आला आहे. आजकालच्या तरुणींनाही आवडेल अशी ही खास डिझाईन आहे.
कोणत्याही वयाच्या महिलांना हा नेकलेस छान दिसेल. हिरव्या मण्यांसोबत सोन्याचे लॉकेट जोडलेला हा नेकलेस उत्तम क्लासी लूक देतो.
जुने डिझाईन्स सोडून काहीतरी नवीन आणि ट्रेंडी हवं असेल तर ही डिझाईन निवडा. साडी आणि लेहेंगा अशा दोन्हीवर हा परफेक्ट लूक देईल.