कोंडा ही अनेक लोकांना भेडसावणारी समस्या आहे. डोक्यावर पांढऱ्या पावडरीसारखा दिसणारा कोंडा खाज सुद्धा येऊ शकतो.
स्वच्छतेचा अभाव, तणाव, खाण्याच्या सवयी यामुळे कोंडा होऊ शकतो.
कोंडा कमी करण्यासाठी मदत करणारे काही घरगुती उपाय येथे दिले आहेत.
कोरफडीचा गर २० मिनिटे डोक्याला लावा आणि मसाज करा. नंतर शाम्पूने धुवा. कोंडा कमी करण्यासाठी हा उपाय चांगला आहे.
सफरचंद व्हिनेगर थोड्या पाण्यात मिसळा आणि डोके धुवा. कोंडा कमी करण्यास मदत होईल.
दोन चमचे दह्यात थोडा लिंबाचा रस मिसळून हेअर पॅक बनवा. हा पॅक डोक्याला लावा. कोंडा कमी करण्यासाठी हा पॅक चांगला आहे.
रोज १५ मिनिटे खोबरेल तेलाने डोके चांगले मसाज करा. नंतर शाम्पूने धुवा.
थोडी मेथी पाण्यात भिजवून मिक्सरमध्ये वाटून घ्या. मेथीची पेस्ट डोक्याला लावा. १५ मिनिटांनी धुवा.
तुम्हीही रोज पालक खाताय?, जाणून घ्या 'हे' अनपेक्षित धोके
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी गुलाबपाणी किंवा तांदळाचे पाणी, कोणते चांगले?
वयानुसार किती तासांची झोप घ्यावी?, जाणून घ्या
मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवायचीय?, आहारात समाविष्ट करा या गोष्टी