सध्या लॅपटॉप, मोबाईल आणि टीव्हाचा अत्याधिक प्रमाणाव वापर वाढल्याने डोळ्यांच्या आरोग्याला नुकसान पोहोचले जात आहे. अशातच डोळ्यांचे आरोग्य राखणे फार महत्वाचे आहे.
सध्या डोळ्यांसंदर्भात मोतीबिंदू, अंधत्व, डोळ्यांमध्ये जळजळ होणे किंवा कोरडे होण्याची समस्या उद्भवल्या जात आहेत. यावरील उपाय काय पाहू.
दीर्घकाळापर्यंत स्क्रिनचा वापर केल्याने डोळ्यांना थकवा जाणवू लागतो. यामुळे डोळ्यांना आराम मिळण्यासाठी कमीत कमी 6-8 तासांची झोप घ्यावी.
सध्या वाढत्या स्क्रिन टाइममुळे डोळ्यांवर ताण पडला जातो. यामुळे स्क्रिन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करा.
प्रत्येक सहा किंवा वर्षातून एकदा आय चेकअप करा. जेणेकरुन वेळीच समस्येवर निदान करता येईल.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करू शकता. यामुळे डोळ्यांना आराम आणि थंडावा मिळेल.