घराच्या गार्डनमध्ये अथवा बाल्कनीत गुलाबाचे रोप लावल्याने घराची सुंदरता वाढली जाते. जाणून घेऊया गुलाबाचे रोप लावण्याची योग्य पद्धत...
गुलाबाचे रोप खरेदी करुन आणले असल्यास अथवा त्याला मूळ असल्यास ते एक दिवस आधी रात्री पाण्यात ठेवा.
गुलाबाचे रोप कोणत्याही सीझनमध्ये लावू शकता. पण वसंत ऋतूच्या आधी गुलाबाचे रोप लावणे उत्तम मानले जाते.
गुलाबाचे रोप लावायचे असल्यास त्यासाठी प्लास्टिकच्या कुंडीचा वापर करू नये. यासाठी सीमेंट अथवा मातीची कुंडी वापरू शकता.
गुलाबाच्या रोपात मातीत वर्षातून दोनदा खत जरुर टाका. यामुळे गुलाबाचे रोप टवटवीत येईल. याशिवाय उकडलेल्या बटाट्याचे पाणीही रोपात टाकू शकता.
रोप कडक उन्हापासून दूर ठेवा. अन्यथा रोपाचे नुकसान होण्याची शक्यता वाढली जाते.
गुलाबाच्या रोपासाठी 6-7 तासांचे ऊन दाखवणे गरजेचे असते. याशिवाय मातीतील ओलरसपणाकडे देखील लक्ष द्यावे. रोपाला दिवसातून दोनदा पाणी जरुर टाका.
गुलाबाचे रोप तुम्ही त्याचे देठ तिरक्या पद्धतीने कापूनही लावू शकता. यावेळी माती आणि पाण्याच्या प्रमाणाकडे लक्ष द्या.
जगातील सर्वाधिक कमी लोकसंख्या असणारे 6 देश
पावसाळ्यात घरातील लाल मुंग्या होतील गायब, करा हे 5 सोपे उपाय
केसांना फाटे फुलटेत? लावा केवळ हे 2 पॅक
अनंत-राधिकाच्या हळदीला अंबानी VS सेलेब्सच्या लूकचा जलवा