आचार्य चाणक्याच्या धोरणांचा अवलंब करून आपल्या अनेक समस्या सोडवल्या जाऊ शकतात. त्यांच्या चाणक्य नीती मधील गोष्टी स्वीकारल्याने तुमच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो.
आपल्या पाठीमागे काम बिघडवणाऱ्या आणि समोर गोड बोलणाऱ्यांपासून दूर राहिले पाहिजे. असे लोक त्या घागरीसारखे असतात ज्याचे तोंड दुधाने भरलेले असते आणि आत विष असते.
एखाद्याने नद्यांवर, शस्त्रे असलेले लोक, मोठे नखे आणि शिंगे असलेले प्राणी, वाईट लोक आणि राजघराण्यांवर विश्वास ठेवू नये.
ज्यांचा जीवनसाथी सर्व काही स्वीकारतो, ज्यांची मुले नियंत्रणात राहतात आणि जे वाईट काळात समाधानी राहतात त्यांच्यासाठी पृथ्वीवर स्वर्ग आहे
वाईट लोकांवर अजिबात विश्वास ठेवू नका. चांगल्या मित्रांवरही जास्त विश्वास ठेवू नये. मित्राला राग आला तर तो आपल्या गुप्त गोष्टी सार्वजनिक करू शकतो
मूर्खपणा दु:ख देतो. कधी कधी अतिउत्साहही दुखावतो. पण, दुस-याच्या घरात राहणं हे सगळ्यात क्लेशदायक असतं.
या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या