तुळशीची माळ सुकलेल्या तुळशीच्या देठांपासून तयार केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीची माळ आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे शुक्र आणि बुध ग्रह मजबूत होण्यास मन शांत राहते.
तुळशीची माळ गळण्यात घालण्याआधी ती गंगाजलने धुवावी आणि नंतरच घालावी. याशिवाय कोणत्याही स्थितीत तुळशीची माळ एकदा घातल्यानंतर पुन्हा काढून ठेवू शकत नाही.
धार्मिक मान्यतेनुसार, तुळशीच्या माळेसोबत रुद्राक्ष कधीच घालू नये. असे करणे अशुभ होतो.
तुळशीची माळ घातल्यानंतर काही नियमांचे पालन करावे. सर्वप्रथम तुम्हाला सात्विक भोजन करावे लागते.
तुळशीची माळ घातल्यानंतर मद्यपान चुकूनही करू नये. अन्यथा कुटुंबावर मोठे संकट येऊ शकते.
सनातन धर्मात मांसाहार करणे वर्ज्य आहे. अशातच तुळशीची माळ गळ्यात घातली असल्यास मांसाहाराला हातही लावू नये.
तुळशीची माळ घातल्यानंतर कांदा-लसूण वापरून तयार केलेले पदार्थांचे सेवन करणे वर्ज्य असते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.