देशात बहुतांश अशी मंदिरे आहेत ज्याबद्दल वेगवेगळ्या परंपरा आणि मान्यता आहेत. अशातच उत्तर प्रदेशात देखील एक अनोखे आणि लोकप्रिय मंदिर आहे.
देवाला कधीच अंड्यांचा नैवेद्य दाखवला जात नाही. पण उत्तर प्रदेशातील मंदिरात नैवेद्य म्हणून महिला अंडी दाखवतात.
उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमधील नगरसेन बाबा यांचे प्राचीन प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची परंपरा अशी आहे की, नगरसेन बाबांना अंडी अर्पण केली जातात.
अंड्यापासून नगरसेन बाबांना अंडी, लाडू आणि फुले अर्पण केली जातात. याशिवाय मुलांच्या सुख-समृद्धीसाठी पूजा-प्रार्थनाही केली जाते.
वैशाख महिन्यात नगरसेन बाबांच्या मंदिरात जत्रेचे आयोजन केले जाते. यावेळी देशभरातून भाविक येतात. अशी मान्यता आहे की, अंड्यांचा नैवेद्य दाखवल्याने मुलांचे आयुष्य उत्तम होते.
खऱ्या भक्तीभावाने नगरसेन बाबांची पूजा केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मंदिराची मान्यता आहे.
महिला आपल्या मुलांच्या उत्तम भवितव्यासाठी नवस करतात आणि अंड्यांचा नैवेद्य दाखवतात. दररोज हजारोंच्या संख्येने अंड्यांचा नैवेद्य भाविकांकडून दाखवला जातो.