प्रेम कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकते. अशातच तुमचा पार्टनर वयाने मोठा असल्यास नाते दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा.
पार्टनर वयाने मोठा असल्यास तुमच्या दोघांमधील वयाचे अंतर सर्वप्रथम समजून घ्या. अन्यथा पार्टनरला वारंवार वयावरून टोचून बोलल्यास नाते मोडले जाऊ शकते.
पार्टनर वयाने मोठा असल्यास त्याला काही गोष्टींबद्दल अधिक अनुभव असू शकतो. त्यानुसारच तुम्हाला तो करियर आणि आयुष्याबद्दलचे सल्ले देईल. याला पार्टनरचा अहंकार समजण्याची चूक करू नका.
वयामध्ये अंतर असल्याने दोघांनी एकमेकांच्या आवड जपली पाहिजे. जेणेकरून नात्यात गोडवा टिकून राहण्यास मदत होईल.
दोन्ही पार्टनरने एकमेकांचे विचार समजून घेतले पाहिजेत. याशिवाय एकमेकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचीही वेळोवेळी काळजी घ्यावी.
पार्टनर वयाने मोठा असल्यास आपलीच मर्जी नेहमी त्याच्यावर करू नका. ही सवय नात्यात अहंकाराची भावना निर्माण करू शकते. यामुळे नाते मोडले जाऊ शकते.
पार्टनर तुमच्यापेक्षा वयाने लहान असल्यास त्याचा स्वभाव समजून घेण्याचा प्रयत्न करा. याशिवाय पार्टनरचे काही चुकत असल्यास जरूर बोला. पण काही गोष्टी समजावूनही सांगा.