झोपेत श्वास घेताना घश्याजवळील सॉफ्ट टिश्यूचे कंपन होते. याच कारणास्तव घोरण्याचा आवाज येत राहतो. काहीवेळ श्वसननलिकेला सूज येणे, मद्यपान, धुम्रपान यामुळेही घोरण्याची सवय लागू शकते.
घोरण्याच्या सवयीवर घरगुती उपाय करू शकता. यासाठी पुढील काही 5 ड्रिंक्समुळे घोरण्याची समस्या कमी होऊ शकते.
आल्यात सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. तर मधामुळे घश्याला आराम मिळू शकतो. घोरण्याची समस्या असल्यास आलं आणि मधाची चहा पिऊ शकता.
पुदिन्याच्या चहामुळे नाक स्वच्छ होण्यासह सूजेची समस्या कमी होते. यामुळे झोपताना श्वास घेणे सोपे होते. रात्रीच्या वेळी झोपताना एक कप पुदिना उकळवून प्या.
हळदीत सूज कमी करण्याचे गुणधर्म असतात. यामुळे नाक आणि घश्याच्या येथे आलेली सूज कमी होण्यास मदत होऊ शकते. रात्री झोपण्याआधी हळदीचे दूध पिऊन झोपा. यामुळे घोरण्याची सवय कमी होईल.
कॅमोमाइल चहामध्ये आराम देणारे गुणधर्म असतात. यामुळे झोपही उत्तम लागते. अशातच पार्टनरला घोरण्याची सवय असल्यास कॅमोमाइल चहा पिण्यास देऊ शकता.
पार्टनरला घोरण्याची सवय असल्यास मधासोबत गरम लिंबू पाणी प्यायला द्या. यामुळे घोरण्याची सवय हळूहळू कमी होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.