Lifestyle

Heeramandi मधील वहीदाचे 8 एथनिक लूक, खुलेल सौंदर्य

Image credits: Instagram

पटियाला सूट

संजिदा शेखसारखा पांढऱ्या रंगातील पटियाला सूट रिसेप्शन पार्टीसाठी परफेक्ट आहे. यावर गोल्डन रंगात डिझाइन करण्यात आली आहे. अशा सूटवर हेव्ही झूमके सुंदर दिसतील. 

Image credits: Instagram

ऑर्गेंजा लेहेंगा

पिवळ्या रंगातील गोल्डन बॉर्डर असणारा ऑर्गेंजा लेहेंग्यात संदिजा फार सुंदर दिसतेय. हळद किंवा मेंदी सोहळ्यासाठी संजिदासारखा ऑर्गेंजा लेहेंगा परफेक्ट आहे. 

Image credits: Instagram

हेव्ही बॉर्डर नेट साडी

गुलाबी रंगाच्या साडीवर हेव्ही बॉर्डर वर्क करण्यात आली आहे. अशाप्रकारची नेट साडी रिसेप्शन अथवा पार्टी-फंक्शनवेळी नेसू शकता. अशा प्रकारच्या साडीवर न्यूड  मेकअप करू शकता. 

Image credits: Instagram

फ्लोरल प्रिंट साडी

सिंपल आणि सोबर लुकसाठी काळ्या रंगातील फ्लोरल प्रिंट साडी बेस्ट पर्याय आहे. एथनिक लूक क्रिएट करण्यासाठी साडीवर एथनिक ज्वेलरी घालू शकता. 

Image credits: Instagram

सिक्वीन वर्क साडी

पार्टीत चारचौघांमध्ये उठून दिसायचे असल्यास हिरामंडीमधील वहिदासारखी सिक्वीन वर्क ग्रे रंगातील साडी नेसू शकता. साडीवर गुलाबी आणि पांढऱ्या रंगातील फुलांची डिझाइन करण्यात आली आहे. 

Image credits: Instagram

अनारकली सूट

प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये अनारकली सूट असलाच पाहिजे. यामध्ये तुमचा लूक अधिक खुलला जातो. संजिदा शेखसारखा मस्टर्ड रंगातील अनारकली सूट मार्केटमध्ये 2 हजारांमध्ये खरेदी करू शकता.

Image credits: Instagram

सिक्विन वर्क ड्रेस

हेव्ही डिझाइन असणाऱ्या सिक्विन वर्क ड्रेसमध्ये संजिदा ब्युटीफुल दिसतेय. अशा ड्रेसवर एथनिक ज्वेलरी घालू शकता. 

Image credits: Instagram