Marathi

काळवंडलेली चांदीची ज्वेलरी 2 मिनिटांत होईल स्वच्छ, वापरा या ट्रिक

Marathi

काळवंडलेली ज्वेलरी अशी करा स्वच्छ

काळवंडलेली चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अशातच घरच्याघरी 2 मिनिटांत चांदीची ज्वेलरी स्वच्छ करण्यासाठी पुढील काही ट्रिक्स वापरू शकता.

Image credits: pinterest
Marathi

बेकिंग सोडा आणि पाणी

एका वाटीत बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करुन पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये चांदीची ज्वेलरी बुडवून ठेवल्यानंतर हाताने स्वच्छ करा.

Image credits: instagram- silver_store_matapayals
Marathi

अ‍ॅल्यूमिनियम फॉइल आणि गरम पाणी

एका भांड्यात गरम पाणी उकळून घ्या त्यामध्ये मीठ, बेकिंग सोडा आणि अ‍ॅल्यूमिनियम फॉइल ठेवा. यानंतर ज्वेलरी त्यामध्ये ठेवून थोडावेळाने काढा.

Image credits: instagram- silver_store_matapayals
Marathi

टूथपेस्टचा वापर

टूथपेस्टचा वापर करुन चांदीची ज्वेलरी स्वच्छ करा. यासाठी पेस्ट ज्वेलरीवर लावून कोमट पाण्यामध्ये ठेवा.

Image credits: instagram- silver_store_matapayals
Marathi

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

एका वाटीत व्हाइट व्हिनेगर आणि 2 चमचे बेकिंग सोडा मिक्स करा. यामध्ये चांदीची ज्वेलरी 2-3 तास ठेवून द्या. यानंतर ज्वेलरी धुवून कापडाने पुसून घ्या.

Image credits: pinterest
Marathi

लिंबू आणि मीठ

लिंबाचा रस आणि मीठ मिक्स करुन घ्या. यामध्ये काळवंडलेली चांदीची ज्वेलरी ठेवा. 10-15 मिनिटांनी चांदीची ज्वेलरी स्वच्छ धुवा.

Image credits: pinterest

घरातील या ५ वस्तूंनी करा सुंदर सजावट; शेजारी वारंवार येतील बघायला

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना देण्यासाठी 8 पौष्टिक नाश्ता रेसिपी

बॉयफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी खास 7 Trendy Rings, पाहा डिझाइन

बॉटलच्या झाकणापासून तयार करा हे 7 युनिक DIY क्राफ्ट