नवरात्रौत्सवावेळी कन्या पूजन केले जाते. यासाठी काही खास तारखा निवडल्या जातात. जाणून घेऊया कन्या पूजनाची योग्य तारीख...
पंचांगानुसार, यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. यादरम्यान देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते.
विद्वानांनुसार, संपूर्ण नवरात्रौत्सवावेळी कधीही कन्या पूजन केले जाऊ शकते. पण सप्तमी, अष्टमी आणि नवमीच्या तिथीवेळी करणे अधिक श्रेष्ठ मानले जाते.
यंदा शारदीय नवरात्रीमधील सप्तमीची तिथी 10 ऑक्टोंबर, गुरुवारी असणार आहे. या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते.
पंचांगानुसार, अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी यंदा आली आहे. यामुळे 11 ऑक्टोंबरलाही कन्या पूजन करू शकता.
देवी पुराणानुसार, 12 वर्षांपेक्षा कमी वयातील मुलीं साक्षात देवीचे रुप मानले जाते. यामुळेच नवरात्रीच्या वेळी कन्या पूजन केले जाते. यामुळे देवीची कृपा आपल्यावर राहते.