मशरुमसारखे पदार्थ तयार करताना कुकिंग वाइनचा वापर करू शकता. यावेळी गॅस मंद आचेवर ठेवा.
केक तयार करताना बॅटरमध्ये किंवा डेझर्टवेळी कुकिंग वाइन वापरा. यासाठी व्हाइट किंवा रेड व्हाइनचा वापर करु शकता.
पास्ता तयार करताना भाज्या आणि मशरुम भाजून झाल्यानंतर कुकिंग वाइनचा वापर करू शकता. यामुळे पदार्थाला तिखट आणि आंबटसर चव येईल.
संत्र किंवा सफरचंदासारख्या फळांसोबत कुकिंग वाइनचा वापर करू शकता. यावेळी रेड वाइनसोबत दालचिनी आणि साखरेचाही वापर करा.
चिकनला मॅरिनेट आणि त्याची चव वाढवण्यासाठी कुकिंग वाइनचा मॅरिनेटसाठी वापर करू शकता. यासाठी व्हाइट वाइनला हर्ब्स, लसूण आणि लिंबाच्या रसासोबत मिक्स करा.
कुकिंग वाइनचा वापर करुन सॉस तयार करू शकता. पदार्थाला वेगळी चव आणण्यासाठी देखील रेड वाइन उकळवून वापरू शकता.
भाज्या किंवा मीटपासून एखादा पदार्थ तयार करताना कुकिंग वाइनचा वापर करू शकता. यामुळे पदार्थ पॅनला चिकटले जात नाही. याशिवाय पदार्थाची चव वाढली जाते.