ज्या भक्तांना 5 व्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करायचे आहे त्यांच्यासाठी शुभ मुहू्र्त बुधवार 11 सप्टेंबरला सकाळी 10.45 पासून दुपारी 12.18 पर्यंत आहे.
गणपतीचे विसर्जन करण्यासाठी सर्वात आधी लाकडी पाठ तयार करावा. त्यानंतर त्यावर स्वस्तिक तयार करावे.
त्यानंतर गंगाजल टाकावे, त्यावर पिवळ्या रंगाचे कापड अंथरावे. बाप्पाच्या मूर्तीला नवीन वस्र घालून कुंकूवाचे तिलक लावून गणरायाची पूजा करावी.
आसनावर अक्षता टाकावे, गणेशाची मूर्तीवर फुल, फळ आणि मोदक आदी नैवेद्य बाप्पाला अर्पण करावा, बाप्पाची मूर्तीचे विसर्जन करण्याआधी त्यांची विधिवत पूजा करावी.
बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनवणी करावी. त्यानंतर संपूर्ण परिवाराने बाप्पाची आरती करावी. त्यानंतर गणपतीच्या मूर्तीचे विविवध विसर्जन करावे.
त्यानंतर बाप्पाला आपले काही चुकले असेल तर माफी मागावी आणि पुन्हा बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची साध घालावी.
वाचकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ही माहिती पंचांग, धार्मिक ग्रंथ, यावर आधारित आहे. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा करत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.