जर तुम्ही पार्टी वेअर लूकसाठी साडी शोधत असाल तर रवीनाच्या या ट्रान्सपरंट नेट डिझाईनची साडी नक्की पहा. तिने हे हॉल्टर नेक ब्लाउजसोबत चांगले पेअर केले आहे.
रवीना टंडनची मोहरी रंगाची साडी शोभिवंत लुक देत आहे. या प्रकारची कॉटन साडी नेसताना तुमचा रंग लक्षात ठेऊन साडीचे रंग निवडले तर आणखीनच चांगल असत.
आयव्हरी सॅटीन साडी मध्ये तुमची हलका मेकअप आणि वाटल्यास त्यासोबत काँट्रास ब्लाउज देखील पेअर करू शकता तुमचा लुक यामुळे उठून दिसेल.
या गोल्डन शेडच्या कांजीवरम साडीमध्ये रवीना टंडन खूपच तरुण दिसत आहे. ही साडी लग्नासाठी किंवा पार्टीसाठी योग्य पर्याय आहे. या साडीसोबत मोती किंवा डायमंड ज्वेलरी जोडा.
रविना टंडनची ही सी ग्रीन कलरची साडी अप्रतिम दिसते. बॉर्डरसोबतच बुटी वर्क असलेल्या या प्रकारच्या साडीसोबत तुम्ही नेहमी हलका मेकअप करून पहा.
गोल्डन वर्क असलेल्या बनारसी साड्यांची क्रेझ संपत नाही. बॉर्डर आणि पल्लू डिझाइनसह या प्रकारच्या साडीसोबत सोन्याचे दागिने जोडून तुम्ही पारंपारिक लुक मिळवू शकता.
रविना सारखी गोल्डन सिल्क साडी तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी नेसायची असेल तर उत्तम पर्याय आहे. कारण अजूनही गोल्डन रंगाची क्रेझ गेलेली नाही.