उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेसंबंधित काही समस्या उद्भवतात. यापासून दूर राहण्यासाठी काही खास टीप्स जाणून घेऊया.
कडक उन्हात घराबाहेर पडणार असल्यास त्वचेला सनस्क्रिन लावा. जेणेकरुन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेची संरक्षण होईल.
उन्हाळ्याच्या दिवसात हलका आणि पौष्टिक आहाराचे सेवन करा. अत्याधिक तळलेले व मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
दिवसभरातून दोन ते तीन वेळा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.
उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी टोपी आणि सनग्लासेसचा वापर करू शकता. यामुळे त्वचेचे संरक्षण होईल.
उन्हाळ्याच्या दिवसात पुरेशा प्रमाणात पाणी प्या. जेणेकरुन डिहाइड्रेशनच्या समस्येपासून दूर राहू शकता.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.