14 मार्चला देशभरात रंगपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी रंगांची उळधळ करत मोठ्या उत्साहात सणाचा आनंद लुटला जातो.
रंगपंचमीच्या दिवशी मुक्तपणे रंगांची उधळण केली जाते. पण यावेळी बहुतांशजण पांढऱ्या रंगातील कपडे घालत असल्याचे आपण पाहतो. यामागील कारण काय पुढे जाणून घेऊया.
पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे. याशिवाय रंगांची उधळण करताना पांढरा रंग अधिक उठून दिसतो. अशातच रंगपंचमीला बहुतांशजण पांढऱ्या रंगातील कपडे घालतात.
पांढरा रंग शुद्ध आणि नव्या सुरुवातीचा मानला जातो. अशातच रंगपंचमीला पांढऱ्या रंगातील कपडे घातल्याने नवी उर्जा तुमच्यामध्ये संचारली जात असल्याचे बोलले जाते.
पांढरा रंग सामाजिक समानतेचे प्रतीकही मानला जातो. यावेळी एकमेकांसोबतचे वाद दूर करुन सणाचा आनंद घेऊ शकता.
उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून आराम मिळण्यासाठीही पांढऱ्या रंगाचे कपडे रंगपंचमीला घातले जातात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.