सध्याच्या काळात वाढत्या प्रदुषणामुळे केस खराब होतात. याशिवाय केस चिकटही होतात. यावर घरगुती उपाय काय पुढे जाणून घेऊया.
केस चिकट झाले असल्यास मुल्तानी माती आणि गुलाब पाण्याचा हेअर पॅक केसांना लावू शकता. 40 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.
दही आणि आवळ्याचा हेअर मास्क चिकट केसांसाठी फायदेशीर ठरेल. हा हेअर मास्क केसांना 25-30 मिनिटे ठेवून द्या.
एलोवेरा जेल केसांमधील चिकटपणा दूर करण्यास मदत करेल. एलोवेरा जेल केसांना लावल्याने केस चमकदार आणि हेल्दी राहतात.
केसांमधील चिकणपणा दूर होण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये नारळाचे तेल मिक्स करुन केसांना लावा. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस हेल्दी राहतात.
कांद्याचा रस केसांना लावल्याने केस गळती कमी होण्यासह त्यामधील चिकटपणा दूर होण्यास मदत होईल.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.