भगवान खाटु शामला कृष्णाचे रूप समजले जाते. बाबा श्यामचे भक्तांच्या मनामध्ये एक खास स्थान असते. महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी जात असतात.
महाभारतामध्ये खाटु शाम यांच्या कथेचा उल्लेख करण्यात आला आहे. गोष्टीनुसार खाटू श्याम हा भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा मुलगा बर्बरिकचा अवतार आहे.
भगवान खाटु शामला तीन बाण धरी हे टोपणनाव देण्यात आलं आहे. ज्याचा अर्थ 'तीन बाण धारण करणारा' असा होतो, जो त्याला भगवान शिवाकडून मिळाला होता.
खाटु शाम ही कलियुगाची देवता आहे. संपूर्ण भारतात श्याम बाबांची विशेष पूजा केली जाते. येथे गेल्यानंतर भक्तांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होत आहे.
खाटु शाम हे देवस्थान चांगल्या रस्त्याने जोडलेले असते. जयपूर, सीकर आणि दिल्ली सारख्या जवळपासच्या शहरांमधून बस किंवा टॅक्सीद्वारे पोहोचता येते.
खातू श्याम मंदिराजवळ एक तलाव आहे, जेथे स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. अशा वेळी तेथून पाणी घरी आणून फवारणी करावी. त्यामुळे नकारात्मकता दूर होते.
व्यायामाशिवाय पोटावरील चरबी होईल कमी, करा हे 5 उपाय
मुलांमध्ये प्रसिद्ध ६ मेकअप ट्रेंड, तुम्ही यातला कोणता ट्राय केला?
१४ डिसेंबर २०२४: कोणाचे होणार नुकसान आणि कोणाला सावध राहावं लागेल?
वर्ष २०२४ मधील तुम्हाला मिळेल हा आनंद, यासाठी काय करावं लागेल?