दररोज नाश्ताला काय करावे अशा प्रश्न पडला असल्यास झटपट तयार होणारे आणि सोपे रवा-पोह्यांपासून कटलेट तयार करू शकता. पाहा पुढे स्टेप बाय स्टेप रेसिपी सविस्तर…
1 कप पोहा, 2 चमचे दही, 1 चिमूटभर साखर, रवा, आवडीनुसार भाज्या, बटाटा, हिरवी मिरची, धणे-जीरे पावडर, चवीनुसार मीठ.
सर्वप्रथम मिक्सरमध्ये रवा, पोहा, दही आणि साखर मिक्स करुन जाड पेस्ट तयार करा.
पेस्टमध्ये गरम तेलाचे दोन-तीन थेंब, अर्धा चमचा धणे-जीरे पावडर, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची मिक्स करा.
सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करुन झाल्यानंतर त्यामध्ये आवडीच्या भाज्या जसे शिमला मिरची, कोथिंबीर, गाजरही मिक्स करा.
मिश्रणाचे लहान चपट गोळे तयार करुन त्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्या.
शॅलो फ्रायसाठी कटलेट तेलावर सोनेरी रंगाचे होईपर्यंत दोन्ही बाजूने व्यवस्थितीत भाजून घ्या.
एका प्लेटमध्ये रवा-पोह्यापासून तयार केलेल गरमागरम कटलेट हिरवी चटणी किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.