मुलांच्या मानसिक विकासासाठी त्यांना शाळेत पाठवणे पुरेसे नाही. यासाठी मुलांकडे लक्ष देणेही महत्वाचे आहे.
मुलांनी आयुष्यात हुशार आणि चपळ होण्यासाठी त्यांच्याकडून दररोज काही ना काही मेंदूला चालना देणाऱ्या अॅक्टिव्हिटी करुन घ्या.
मुलाच्या आवडीनुसार त्याच्याकडून एखादी क्रिएटिव्ह अॅक्टिव्हिटी करुन घ्या. जसे की, डान्स, पेटिंग. यामुळे मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास मदत होते.
मुलांना मेंदू अॅक्टिव्ह राहण्यासाठी त्यांच्यासोबत सुडोकू, बोर्ड गेम्ससारखे खेळ खेळा.
मुलांना आई-वडिलांनी गोष्टी सांगाव्यात. यामुळे मुलांना नव्या गोष्टी कळतात.
मुलांच्या मानसिक विकासासाठी त्यांना देश आणि जगातील काही जनरल नॉलेजच्या गोष्टी आवश्यक सांगा. यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडली जाईल.
मुलांना शाळेतून आल्यानंतर थोडावेळसाठी झोपावे. यामुळे थकवा दूर होईल आणि अभ्यासात त्यांचे मनही लागेल.