मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी दररोज 10 मिनिटे त्याच्याकडून लिखाणाची प्रॅक्टिस पालकांनी करुन घ्यावी.
पेन किंवा पेन्सिल पकडण्याची योग्य पद्धत शिकवा. यामुळे लिखाण स्वच्छ आणि सुंदर होईल.
घाईघाईमध्ये लिहिल्यास हस्ताक्षर बिघडले जाते. यामुळे संयमाने मुलांना लिखाण करण्यास पालकांनी शिकवावे.
अक्षरांमध्ये किती अंतर आणि त्याचा आकार किती असावा हे शिकवावे.
ड्रॉइंग, क्ले मॉडलिंग किंवा फिंगर एक्सरसाइजच्या मदतीने मुलांच्या हातांची पकड मजबूत करा.
मुलांच्या मेहनतीचे कौतुक करा. यामुळे त्याच्यामधील आत्मविश्वास वाढला जाईल.