Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
हेल्दी लाइफस्टाइल
आपल्या खाण्यापिण्याचा थेट परिणाम त्वचा व आरोग्यावर होतो. यामुळे आहारात पोषण तत्त्वे, व्हिटॅमिनयुक्त पदार्थांचा समावेश असावा. जाणून घेऊया 30 शी नंतर कोणते फूड्स खावेत याबद्दल पुढे.
Image credits: Freepik
Marathi
अँटीऑक्सिडेंटयुक्त पदार्थ
त्वचेवरील सुरकुत्या आणि पिंपल्स दूर राहण्यासाठी डाएटमध्ये अँटीऑक्सिडेंटयुक्त पदार्थांचा समावेश करावा. जसे की, ग्रीन टी, कच्ची हळद किंवा ताजी फळं खावीत.
Image credits: Facebook
Marathi
कोलेजन प्रोटीनचे सेवन
चेहऱ्याच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोलेजन प्रोटीनचे सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे काळवंडलेली त्वचा, सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या दूर होते.
Image credits: Freepik
Marathi
व्हिटॅमिन सी
हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी व्हिटॅमिन सी अत्यंत गरजेचे असते. यामुळे त्वचेला सखोल पोषण मिळण्यासह डेड स्किन दूर होते. डाएटमध्ये आवळा, संत्र किंवा लिंबूसारख्या फळांचा समावेश करावा.
Image credits: Social media
Marathi
हाइड्रेट रहा
त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग राहण्यासाठी दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्या. यामुळे हाइड्रेट राहण्यास मदत होईल. दिवसभरातून कमीत कमी 3 लीटर पाणी प्यायल्याने त्वचा हेल्दी देखील होईल.
Image credits: social media
Marathi
व्हिटॅमिन ए
त्वचा हेल्दी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए फार महत्वाचे आहे. यासाठी आहारात पालक, गाजर, अंड्याचा पिवळा भाग आणि पालेभाज्यांचा समावेश करावा. याच्या माध्यमातून आरोग्याला पोषण तत्त्वे मिळतील.
Image credits: social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.