यंदा अक्षय्य तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणर आहे. या दिवशी काही गोष्टींचे दान करणे शुभ मानले जाते. जेणेकरुन आयुष्यात सुख-समृद्धी कायम टिकून राहिल.
सत्तू काही धान्ये बारीक वाटून घेत तयार केले जाते. उन्हाळ्याच्या दिवसात सत्तूचे सेवन केल्याने शरीर आतमधून थंड राहण्यास मदतहोते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्तूचे दान करू शकता.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गरिबांना चप्पल-शूज अथवा छत्रीचे दान करू शकता. यामुळे कडाक्याच्या उन्हापासून त्यांचा बचाव होईल. असे केल्याने देवाचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळतील.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला कलश एखाद्या ब्राम्हणाला दान करावा. कलशासह आपल्या इच्छेनुसार धान्य, फळ, कपडेही देऊ शकता.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गरजूंना अन्नधान्यांचे दान करा. गहू, तांदूळ अशा काही धान्याचे दान केल्याने आयुष्यात नेहमीच आनंद टिकून राहतो.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गरिबांना फळांचे दान करा. यामुळे आयुष्यात सुख-समृद्धी कायम टिकून राहिल.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.