३ ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारपासून नवरात्रीची सुरुवात होत आहे. ९ दिवस संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. पूर्ण देशात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
करणी माता मंदिर हे बिकानेर, राजस्थान येथे आहे. येथे २०,००० उंदीर आहेत. असं म्हणतात की बाहेरच्या देशातील शत्रू राज्यान हल्ला केल्यावर येथील उंदरांना तीन तीच सैन्य बनवलं होत.
कामाख्या देवी मंदिर आसाममध्ये असून येथे देशभरातून भक्त येत असतात. येथे दगडातून पाणी येत असून आणि महिन्यात एक दिवस दगडातून रक्त येत. पण यामागची गोष्ट कोणालाच माहित नाही.
ज्वाला मंदिर हे हिमाचल प्रदेश येथे आहे येथे जमिनीतून आग बाहेर येत असल्याचं दिसून येत. ही आग कुठून येत आहे ते अजून कोणालाही समजलं नाही.
दुर्गा परमेश्वरी मंदिर हे मंगळूर, कर्नाटक येथे आहे. येथे आईच दर्शन झाल्यानंतर भक्त एकमेकांच्या अंगावर अंगारा फेकत असतात.
आई दंतेश्वरी मंदिर, दंतेवाडा हे मंदिर छत्तीसगढ येथे आहे. ते मंदिर हे ५१ शक्तिपीठांपैकी एक मंदिर मानलं जात. येथे लुंगी आणि धोतर घालूनच देवीचं दर्शन घेता येत.
मध्य प्रदेशमधील मेहेरमध्ये आई शारदेचं मंदिर आहे. येथे असणारी देवी भक्तांशी संवाद साधते, असं सांगितलं जात.