गणपतीला विघ्नहर्ता, बुद्धिची देवता अशा वेगवेगळ्या नावांनी ओखळले जाते. प्रत्येक वर्षी गणोशोत्सवावेळ गणपतीचे मोठे धुमधडाक्यात स्वागत केले जाते. यंदा 7 सप्टेंबरला गणोशोत्सव आहे.
गणेशोत्सवावेळी घरोघरी बाप्पाची प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा इको फ्रेंडली गणपतीच्या मुर्तीची स्थापन केली जाते. पण यंदाच्या गणोशोत्सवाला घरातील काही वस्तूंपासूनही तयार करू शकता.
शेणापासून इको फ्रेंडली गणपती तयार करू शकता. यामुळे पर्यावरणाला कोणतेही नुकसान पोहोचले जात नाही.
हळदीच्या माध्यमातून गणपतीची इको फ्रेंडली मुर्ती तयार करू शकता. यासाठी गव्हाच्या पीठात हळद मिक्स करुन घट्ट पीठ तयार करा. यापासून गणपतीची मुर्ती तयार करू शकता.
घरी असलेल्या मैदा किंवा गव्हाच्या पीठापासून बाप्पाची मुर्ती तयार करू शकता. यामध्ये फूड कलर मिक्स करुनही रंगीत मुर्ती तयार करता येईल.
मातीपासून इको फ्रेंडली गणपतीच्या मुर्तीच्या सजावटीसाठी साबुदाणा, सुका मेवा, रंगीत डाळी यांचा वापर करू शकता.
गणतीची मुर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती किंवा कोणत्याही पीठाचा वापर करू शकता. मुर्ती तयार करण्याचे सोपे व्हिडीओ ऑनलाइन पाहू शकता.