तांदूळ आणि उडीद डाळ ४-५ तास भिजवून ठेवल्यानंतर त्याची घट्ट पेस्ट बनवा. त्यात दही आणि मीठ घाला आणि मिश्रण 6-8 तास किंवा रात्रभर झाकून ठेवा, जेणेकरून ते व्यवस्थित आंबते.
बनवण्यापुर्वी मिश्रणात बेकिंग सोडा घाला आणि हलक्या हाताने मिसळा. तुमची इच्छा असले तर आपण ENO वापरू शकता.
गरम तव्यावर किंवा खोलगट तळाशी असलेल्या तडका तव्यावर थोडं तेल लावून पिठात भरड घाला. ते न पसरवता स्वतःच पसरू द्या.
झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्या. त्यावर उलटण्याची गरज नाही. गॅस वाढवू नका, मंद आचेवर आतपर्यंत शिजू द्या.
डोसा फुगीर आणि सोनेरी झाला की पॅनमधून काढून घ्या. नारळाच्या चटणी किंवा सांबर बरोबर सर्व्ह करा.