An apple a day keeps doctor away ही म्हण केवळ म्हणण्यासाठी नाही. रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुमचे आरोग्य चांगले राहते. यात अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात
सफरचंद चावून खाल्ल्याने दात आणि हिरड्यांची चांगली स्वच्छता होते. हे दातांवर प्लाक साचू देत नाही आणि तोंडातील दुर्गंध कमी करते.
सफरचंदामध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्ग टाळण्यास मदत होते.
सफरचंदामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारते. पेक्टिन फायबर पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत करते. ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते.
सफरचंदामध्ये सॉल्युबल फायबर असतात, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हे हृदयाचे ठोके सामान्य ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरते.
सफरचंद कमी कॅलरीयुक्त फळ असुन फायबरने परिपूर्ण आहे, ज्यामुळे जास्त काळ भूक लागत नाही. स्नॅक म्हणून सफरचंद खाल्ल्यास अनारोग्यकारक खाण्याची सवय कमी होते आणि वजन नियंत्रित राहते.
सफरचंदाचा लो ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने त्यातील साखर शरीरात हळूहळू रिलीज होते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहतो. त्यामुळे टाइप-२ डायबिटीजचा धोका कमी होतो.
यात असलेले अँटीऑक्सिडंट्स, क्वेरसेटिन मेंदूच्या पेशीना नुकसान होण्यापासून वाचवतात. हे स्मरणशक्ती सुधारते. अल्झायमर, डिमेन्शियाचा सारख्या न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजारांचा धोका कमी करते.
सफरचंदामध्ये असलेले व्हिटॅमिन A, C आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला चमकदार बनवतात आणि केसांना मजबूत करतात. हे वृद्धत्वाच्या लक्षणांना कमी करायला मदत करते.
सफरचंदामध्ये असलेले बोरॉन आणि कॅल्शियम हाडांची मजबुती वाढवतात. हे विशेषतः महिलांसाठी उपयुक्त आहे.