थंडीत ओठ फाटल्यामुळे दुखण्यासह तुमचा लूक बिघडला जातो. यामुळे थंडीत गुलाबी ओठांसाठी पुढील काही घरगुती उपाय करू शकता.
मधात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ओठांमध्ये ओलसरपणा टिकून राहतो.
कोरफडीचा गर ओठांना लावल्याने त्वचा मऊसर होते. याशिवाय ओठ फुटण्याच्या समस्येपासून दूर राहता.
नारळाच्या तेलामुळे ओठ मऊ होतात. रात्री झोपण्याआधी ओठांना नारळाच्या तेलाने मसाज करा.
दूधही फुटलेल्या ओठांसाठी लावू शकता. दूधाची मलई ओठांच्या त्वचेमध्ये ओलसरपणा टिकवून ठेवण्यासह मऊ होण्यास मदत करेल.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई असते. रात्री झोपण्याआधी बदामाच्या तेलाने ओठांना मसाज करून झोपा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.