पाणी – 2 कप, दूध – 1 कप (ऐच्छिक), चहा पावडर – 2 चमचे, आले – 1/2 इंच तुकडा (कुटलेला), दालचिनी – 1 छोटा तुकडा, वेलची – 2 नग (थोडी कुटून), साखर किंवा गूळ – स्वादानुसार
एका पातेल्यात 2 कप पाणी गरम करा. पाणी उकळायला लागल्यावर आले, दालचिनी, वेलची, लवंग, आणि मिरे घाला. मसाले 2-3 मिनिटे उकळून त्यांचा अर्क पाण्यात उतरू द्या. चहा पावडर टाकून ते उकळा.
त्या चहामध्ये दूध टाकून तो चहा उकळून घ्या. चहाला आपण जितकं उकळून घेऊ तेवढी त्याची चव चांगली लागत जाते.
चहा बराच वेळ उकळून घ्या म्हणजे मसाल्यांचा अर्क त्याच्यामध्ये उतरेल. त्यानंतर तो कपमध्ये ओतून घ्या.
जर तुम्हाला हलकासा मसाला फ्लेवर हवा असेल तर मसाल्यांचे प्रमाण कमी ठेवा. साखरेऐवजी गूळ वापरल्यास तो अधिक आरोग्यदायी ठरेल.