16 ऑक्टोबरला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते असे म्हटले जाते. यावेळी काही खास उपाय करावेत.
ज्योतिषानुसार, शरद पौर्णिमेच्या दिवशी रात्री 5 ठिकाणी दिवे लावल्याने देवीचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय प्रत्येक प्रकारचे सुख मिळते.
शरद पौर्णिमेला देव्हाऱ्यात शुद्ध तूपाचा दिवा लावा. याशिवाय देवी लक्ष्मीची पूजा करा. यामुळे घरात सुख-समृद्धी येईल.
शरद पौर्णिमेला रात्री घरी किचनमधील पिण्याचे पाणी ठेवतो तेथे दिवा लावा. हे स्थान पितरांचे मानले जाते. येथे दिवा लावल्याने पित्र प्रसन्न होतात.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला शरद पौर्णिमेला दिवा लावा. याशिवाय दिवा रात्रभर तेवत राहणे महत्वाचे आहे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होईल.
शरद पौर्णिमेच्या रात्री घराच्या छतावर एक दिवा नक्की लावा. देवी लक्ष्मी दिव्याला पाहून घरात प्रवेश करते असे मानले जाते.
घराती तिजोरी अथवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता तिथे एक दिवा लावा. हे स्थान तुमच्या सुख-समृद्धिसंदर्भातील असते.