पूजेसाठी फुलांचा वापर केला जातो. अशाच देवाला वाहिलेली फुलं फेकून देत असाल तर थांबा. याच फुलांपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकता. याबद्दल पुढे पाहूया...
सुकलेली फुलं पाण्यात उकळवून त्यापासून सुगंधित स्प्रे तयार करू शकता. यामध्ये एसेंशियल ऑइलही मिक्स करू शकता.
फुलं सुकवून त्यामध्ये कापूर आणि 1-2 अगरबत्ती मिक्स करुन सुगंधित आणि होममेड अगरबत्ती तयार केली जाऊ शकते.
मार्केटमध्ये धूप कप मिळतात. घरच्याघरी धूप कप तयार करण्यासाठी वापरलेली फुलं, तूप, धूप आणि कापूरचा वापर करु शकता.
फुलांचा रियुज करण्यासाठी त्यामध्ये ओलरस पेपर मिक्स करुन मिश्रण तयार करा. मिश्रणापासून हँडमेड पेपर तयार करता येईल.
पूजेसाठी वापरलेल्या फुलांपासून किटकनाशके तयार करू शकता. यासाठी फुलं पाण्यात उकळून घ्या.
जुन्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करू शकता. खासकरुन गोंड्याच्या फुलांपासून नारंगी अथवा पिवळा रंग तयार करता येईल.
सुकलेल्या फुलांपासून सुंगधित मेणबत्ती तयार करू शकता. यासाठी मेण वितळवून त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अथवा अन्य फुलांच्या पाकळ्या मिक्स करू शकता.