राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 ची यादी जाहीर झाली आहे. या वर्षी 4 खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
खेलरत्न पुरस्कार 2024 प्राप्त करणाऱ्या खेळाडूंमध्ये नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलीट खेळाडू प्रवीण कुमार हे आहे.
खेलरत्न पुरस्कार हा भारतातील खेळाडूंना दिला जाणारा सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार आहे.
खेलरत्न पुरस्काराचे नाव आधी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते परंतु 2021 मध्ये त्याचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे ठेवण्यात आले.
4 वर्षांच्या कालावधीत खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी खेलरत्न पुरस्कार दिला जातो.
खेलरत्न पुरस्कार विजेत्या खेळाडूंना पदक, प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक दिले जाते.
खेलरत्न पुरस्कार विजेत्या खेळाडूला २५ लाख रुपये दिले जातात.
2020 मध्ये खेलरत्न पुरस्काराची रक्कम 7.5 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये करण्यात आली.
खेलरत्न पुरस्कार 1991-1992 मध्ये सुरू करण्यात आला.