अन्नपदार्थांची चव वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. वरण-भातासोबत लोणच असल्यास अन्नाची चव अधिकच वाढली जाते. पाहूया कांद्याचे झटपट होणाऱ्या लोणच्याची रेसिपी सविस्तर.
कांद्याचा वापर प्रत्येक रेसिपीसाठी तयार केला जातो. अशातच वरण-भातासोबत कांद्याचे इंस्टेट लोणचे तयार करू शकता.
2 पातळ चिरलेले कांदे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद, अर्धा चमचा राई, पाव चमचा हिंग, लिंबाचा रस, 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ.
एका वाटीत चिरलेला कांदा घेऊन त्याला लाल तिखट, हळद व्यवस्थितीत लावून 2-3 मिनिटे ठेवा.
पॅनमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये राई आणि हिंगाची फोडणी तयार करुन गॅस बंद करा.
लोणच्यासाठी तयार केलेली फोडणी कांद्यावर घालून चमच्याने सर्व सामग्री व्यवस्थितीत मिक्स करा.
लोणच्यावरुन लिंबाचा रस घालून वरण-भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.