सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मॉइश्चराइजर लावा. यानंतर कंसीलवर लावून बेस तयार करा.
पापण्यांना काळ्या रंगातील आयशॅडो लहान ब्रशने लावा. यावेळी फार कमी प्रमाणात काळ्या रंगाचा आयशॅडो लावा. जेणेकरुन स्मोकी आयलूक येईल.
काळ्या रंगातील आयशॅडो व्यवस्थितीत पापण्यांना लावल्यानंतर त्यावर हलकी ब्राउन आयशॅडोही लावा. यामुळे डोळ्यांचे अधिक सौंदर्य खुलले जाईल.
पापण्यांवर काळ्या आणि ब्राउन आयशॅडोचा बेस तयार केल्यानंतर कोपऱ्यातून ब्लू आयशॅडो लावा.
ब्लू स्मोकी आय लूकएवजी ब्लू आयलायनर लावूनही डोळ्यांचे सौंदर्य खुलवू शकता.
तुमच्याकडे ग्लिटर ब्लू आयशॅडो असेल तरीही डोळ्यांच्या पापण्यांना लावू शकता. यावर काळ्या रंगातील आयलाइनर आणि काजळाने लूक पुर्ण करा.