अभिनेत्री कंगना राणौतने परिधान केलेल्या मल्टी कलरमधील सलवार सूट सणासुदीला बेस्ट आहे. या सलवार सूटमध्ये नक्कीच तुमचे सौंदर्य खुलले जाईल.
मकर संक्रांतीसारख्या सणाला कंगना सारखा सिक्वीन वर्क करण्यात आलेला सलवार सूट खरेदी करू शकता. अशाप्रकारचा सलवार सूट 2 हजारांपर्यंत खरेदी करता येईल.
बांधणी डिझाइनमध्ये मल्टीकलर असणारा सलवार सूट सणावेळी ट्राय करू शकता. या सलवार सूटवर हेव्ही झुमके छान दिसतील.
न्यूड पिंक रंगातील सलवार सूटमध्ये कंगनाचा सिंपल आणि सोबर लूक दिसतोय. ऑर्गेंजा सलवार सूटच्या वेगवेगळ्या डिझाइन आणि पॅटर्न मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन पद्धतीने खरेदी करू शकता.
सिंपल पण क्लासी लूकसाठी कंगना रणौतसारखा सणावेळी लूक रिक्रिएट करू शकता.
फ्लोरल डिझाइन सलवार सूटचा सध्या ट्रेन्ड आहे. अशाप्रकारचा सलवार सूट 2 हजारांपर्यंत खरेदी करता येईल. यावर मोत्याची किंवा एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
सणासुदीला चारचौघांत उठून दिसण्यासाठी कंगना राणौतसारखा गोटा पट्टी सलवार सूट खरेदी करू शकता. या सूटवर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी दिली आहे.
एथनिक लूककसाठी ए लाइन अनारकली स्टाइल सलवार सूट खरेदी करू शकता. यावर एथनिक किंवा सिल्व्हर ज्वेलरी ट्राय करू लूक पूर्ण करा.