हिंदू धर्मात चांदी आणि सोने खरेदी करण्याला विशेष महत्व आहे. पण याची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लाते. अशातच चांदी खरेदी करण्याचा शुभ दिवस कोणता हे माहितेय का?
असे मानले जाते की, गुरुवारच्या दिवशी चांदीची खरेदी करणे शुभ असते. गुरु हा धन, ज्ञान आणि समृद्धीचा ग्रह मानला आहे.
गुरुवारच्या दिवशी चांदीची खरेदी केल्यास घरात सुख आणि शांती येते. याशिवाय गुरुवारच्या दिवशी सकारात्मक उर्जा अधिक असते.
चांदीला चंद्राचा धातू मानण्यात आले आहे. यामुळे पौर्णिमेला चांदी खरेदी करू शकता. या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.
पौर्णिमेच्या दिवशी चांदी खरेदी केल्यास घरात आणि आयुष्यात सकारात्मकता येते. याशिवाय धनात वाढही होते.
हिंदू पंचांगानुसार, अक्षय्य तृतीयेला चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी सोन आणि चांदी खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या घरात कधीच चांदीच्या वस्तूंचा अभाव पडत नाही.
अक्षय्य तृतीयेला चांदी खरेदी करणे शुभ आणि धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते.
पुष्य नक्षत्रात चांदीची खरेदी केल्यास घराची भरभराट होते. याशिवाय धनलाभ देखील होऊ शकतो.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.