आजकाल महिलांमध्ये 1 ग्राम गोल्ड ज्वेलरी खूप लोकप्रिय होत आहे. याचं कारण म्हणजे, कमी किमतीत ही ज्वेलरी खऱ्या सोन्यासारखा प्रीमियम आणि स्टायलिश लूक देते.
काही काळानंतर 1 ग्राम गोल्ड ज्वेलरीचा रंग फिका पडू लागतो किंवा ती काळी दिसू लागते. अखेर 1 ग्राम गोल्डचे दागिने काळे का पडतात आणि त्यांना पुन्हा नव्यासारखं कसं ठेवायचं?
1 ग्राम गोल्ड ज्वेलरी पूर्णपणे सोन्याची नसते. तिचा बेस मेटल तांबे, पितळ किंवा इतर धातू असतो, ज्यावर सोन्याचा मुलामा दिला जातो. म्हणूनच ही ज्वेलरी खऱ्या सोन्यापेक्षा स्वस्त असते.
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकाच्या शरीराचा pH लेव्हल वेगवेगळा असतो. जेव्हा घाम दागिन्यांच्या संपर्कात येतो तो गोल्ड प्लेटिंगवर परिणाम करतो आणि दागिन्यांची चमक कमी करतात.
जर दागिन्यांवरील गोल्ड प्लेटिंगची क्वालिटी चांगली नसेल किंवा त्याचा थर पातळ असेल, तर तो लवकर निघून जाऊ शकतो. अशावेळी दागिन्यांचा रंग बदलण्याची शक्यता जास्त असते.
परफ्यूम, डिओड्रंट, हेअर स्प्रे, मॉइश्चरायझर आणि मेकअप प्रोडक्ट्समधील केमिकल्स गोल्ड प्लेटिंगला नुकसान पोहोचवू शकतात. या वस्तूंच्या सतत संपर्कात आल्याने दागिन्यांचा रंग बदलू शकतो.
वारंवार पाण्याच्या संपर्कात आल्याने दागिन्यांवरील मुलामा हळूहळू निघून जातो. त्यानंतर खाली असलेला मूळ धातू (बेस मेटल) दिसू लागतो, ज्यामुळे दागिने काळे दिसू लागतात.
वातावरणातील सल्फर कंपाऊंड्स आणि प्रदूषणामुळेही धातूचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. याच प्रक्रियेमुळे दागिन्यांची चमक कमी होते.