भारतातून इराणमध्ये फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना आता व्हिसाची गरज भासणार नाहीये. खरंतर, इराणच्या पर्यटनाला चालना मिळण्यासाठी तेथील सरकारने हा निर्णय घेतला आहे.
इराणमधील ऐतिहासिक वास्तू आणि शिल्पकला तुम्हाला त्याचा प्रेमात पाडणाऱ्या आहेत. अशातच इराणमधील टॉप-5 टुरिस्ट डेस्टिनेशन पाहूया....
तेहरान इराण शहराची राजधानी असून येथे काही ऐतिसाहिक इमारती आहेत. येथे तुम्ही ग्रँड बाजार, नॅशनल म्युझियम, गुलिस्तान पॅलेस, सादाबाद कॉम्प्लेक्स अशा काही ठिकाणी भेट देऊ शकता.
इराणमधील सुंदर असे तरबीज शहर टॉप-5 टुरिस्ट डेस्टिनेशपैकी एक आहे. येथे फिरण्यासह शॉपिंगची मजा घेता येईल. शाह गोली, ब्लू मस्जिद, तरबीज बाजार, अजरबॅजानचे म्युझियम येथेही भेट देऊ शकता.
इराणमधील इस्फान टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. येथे फार जुन्या इस्लामिक इमारती आहेत. इस्फानच्या ठिकाणी तुम्हाला नक्श-ए-जहां स्क्वेअर, इमाम शाह मस्जिद, अली कापू पॅलेस येथे फिरू शकता.
यज्द इराणच्या इस्फान शहरापासून 270 किलोमीटर दूरवर स्थित आहे. यज्द येथील जुनी घरे आणि आर्किटेक्चरचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. येथे अमीर चकमक पॅलेस, जामेह मस्जिदला भेट देऊ शकता.